नमस्कार,महाराष्ट्र शासनाने चालु वर्षे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी RTE-25 अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. सदर प्रवेश प्रक्रिया ही वय वर्षे 3 ते 6 वर्षाच्या बालकांसाठी आहे,याअंतर्गत आपल्याजवळील शाळांमधील 25% कोटा हा शासनामार्फत अर्ज घेऊन पात्र लाभार्थी मुलांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. आज आपण ही संपुर्ण निवड प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे व कोणती कागदपत्रे,कोणती शाळा, पात्र व अपात्र निष्कष, ऑनलाईन करण्याची शेवटची तारीख व अर्ज कसा भरायचा या सर्व गोष्टी पाहणार आहोत.
महाराष्ट्र शासनाचा 2009 चा कायदा शिक्षणाचा अधिकार अंतर्गत 14 वर्षाखालील विदयार्थ्यांना मोफत शिक्षण देते. सदरच्या RTE-25 अंतर्गत खाजगी शाळांमध्ये गरीब आणि बीपीएल कुंटुंबातील,आर्थिक दुष्टया दुर्बल घटक(EWS),अनाथ बालके,विधवा महिला,एडस बाधित मुले तसेच विविध आरक्षित प्रवर्गातील मुलांना यात लॉट्री पध्दतीने शिक्षणासाठी प्रवेश दिला जातो. (RTE admission How to apply in 2025)
आरटीई 25(RTE-25)साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे-(For RTE admission How to apply in 2025, what are the documents, rules and criteria complete information.? आर.टी.ई प्रवेशासाठी 2025 मध्ये अर्ज कसा करायचा,कागदपत्रे कोणती,नियम व निकष संपुण माहिती)
1.आर टी ई 25 साठी ऑनलाईन प्रवेशकरिता सर्व कागदपत्रे ही ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपुर्वीची असावीत. त्यानंतर कागदपत्रे स्वीकरली जाणार नाहीत अशी सुचना देण्यात आली आहे.
2.बालकाचे आधारकार्ड
3.वंचित घटक मध्ये खालील प्रवर्गाच्या बालकांचा समावेश होतो. जसे की अनुसुचित जाती,अनुसुचित जमाती, भटक्या जमाती (अ),भटक्या जमाती (ब),भटक्या जमाती (क),भटक्या जमाती (ड),इतर मागास(ओबीसी),विशेष मागास(एस,बी,सी) प्रवर्गातील बालके-वंचित जात संवर्गातील बालक असल्यास बालकाचे किंवा वडीलांचे जात प्रमाणपत्र. उत्पनाच्या दाखल्याची आवश्यकता नाही,परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार नाही.
4.दिव्यांग मुलांसाठी वैदयकीय प्रमाणपत्र-जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैदयकीय अधिक्षक यांच्याकडील 40 टक्के आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबचे प्रमाणपत्र. एच,आय,व्ही बाधित/प्रभावित असल्यास-जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैदयकीय अधिक्षक यांच्याकडील प्रमाणपत्र
5.कोव्हीड प्रभावित बालक (ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन १ एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत प्रादुर्भावामुळे मयत झाले)
6.अनाथ बालक असल्यास-अनाथलयाची किंवा बालसुधारगृहाची कागदपत्रे
7.आर्थिकदृटया दुर्बल घटक(EWS)-असल्यास तहसिलदार यांच्याकडील दाखला.
- घटस्फोटित महिला असल्यास- न्यायालयाचा निर्णय,सदर महिलेचा किंवा बालकाचा रहिवासी पुरावा,
8.जन्म तारखेचा पुरावा- ग्रामपंचायत,नगरपालिका,महानगरपालिका,रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील दाखला,अंगणवाडी,बालवाडील रजिस्टरमधील दाखला किंवा आई वडील अथवा पालकांकडील प्रतिज्ञापत्र. - रहिवासी/ वास्तवा पुरावा-रेशनकार्ड,ड्रायविंग लायसेन्स,टेलिफोन बील देयक,पाणी पटटी,घरपटटी,राष्ट्रीकृत बँकचे पासबुक,पासपोर्ट,मतदानकार्ड तसेच रहिवासी पुरावा म्हणून वरील कागदपत्रे नसतील तर दुयम निंबध यांच्याकीडील नोंदणीकृत भाडेकरारा-(सदरचा भाडेकरार हा ऑनलाईन फॉर्म भरण्यापुर्वीचा दिनांकाचा असवा व ११ महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा)
ऑनलाईन अर्ज करण्यापुर्वी पालकांना काही सुचना(For RTE admission How to apply in 2025, what are the documents, rules and criteria complete information.? आर.टी.ई प्रवेशासाठी 2025 मध्ये अर्ज कसा करायचा,कागदपत्रे कोणती,नियम व निकष संपुण माहिती)
1.ऑनलाईन अर्ज करताना बालकाच्या जन्म दाखल्याप्रमाणेच त्याचे संपुर्ण नाव भरा तसेच त्याची जन्मतारीख जन्मदाखल्या प्रमाणेच भरा.
2.पालकांनी रहिवासी पत्ता हा गुगल लोकेशनला पुन्हा पुन्हा तपासून पाहूनच सबमिट करावा,
- 1 किमी, 1 ते 3किमी अंतरावरील शाळा निवडत असताना कमाल 10 च शाळा निवडाव्यात.
4.पालकांनी आपल्या पाल्याचा एकच अर्ज भरावा,एका बालकाचे दोन अर्ज आढळून आल्यास बालकाचे
दोन्ही अर्ज बाद होतील.
5.अर्ज ऑनलाईन भरताना चुकला असल्यास तो डिलीट करावा मगच दुसरा अर्ज भरावा,
6.अर्ज भरताना अर्ज क्रमांक,अर्जातील मोबाईल नंबर व अर्जाची प्रत आपल्याजवळ ठेवावी.
7.अर्ज भरताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढल्यास आपला अर्ज रदद केला जाऊ शकतो. - चालु वर्षासाठी रहिवासी पुरावा म्हणून गॅस बुक रदद करण्यात आले याची पालकांनी नोंद घ्यावी.
- सुचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
आरटीई 25 महाराष्ट्र प्रवेश अर्ज भरा.
वरील सर्व कागदपत्रे किंवा नियम अटी वाचुन झाल्यानंतर सर्व कागदपत्रे आपल्या जवळ आहेत का ते पाहा.सदर योजने मुळे वंचित घटक व विविध प्रवर्गातील मुलांना आपल्या शिक्षणाचा हक्क प्राप्त होणार आहे त्यामुळे खाजगी शाळामध्ये त्यांना मोफत शिक्षण घेता येणार आहे तर अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
योजना | RTE-25 |
राज्य | महाराष्ट्र शासन |
विभाग | शालेय शिक्षण विभाग |
अर्ज भरण्याची तारीख तारीख | 14 जानेवारी 2025 |
कोणत्या वर्गासाठी प्रवेश | प्ले ग्रुप, पहिलीसाठी |
निवड प्रक्रिया | लॉट्ररीपध्दतीने |
अर्ज करण्याची पध्दत | ऑनलाईन |
वर्ष | 2025-26 |
राखीव जागा | 25% |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 27 जानेवारी 2025 |
अधिकृत इेमेल | educom-mah@mah.gov.in |
अधिकृत वेबसाईट | https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new |
किंती वर्षापर्यत लाभ | इयत्ता अधिकतम 8 वी पर्यंत |
अर्ज कसा भरावा हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
आरटीई 25 टक्के बाबत ऑनलाईन प्रवेशासाठी बालकाचे वय बाबत सन 2025-26 महाराष्ट्र शासन निर्णय परिपत्रक काढून सदर योजनेसाठी बालकाचे वय ठरवले आहे तसेच काही सुचना देण्यात आल्या आहेत.याबाबत असे की शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्यासाठी दि 18-09-2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये मानवी दिनांक 31 डिसेंबर करण्यात आली आहे.प्ले ग्रुप/नर्सरी म्हणजेच इयत्ता 1 ली पुर्वीचा 3 रा वर्ग यासाठी वर्ष 3 पेक्षा जास्त व इयत्ता पहिली साठी 6 वर्षापेक्षा जास्त असायला हवे.
अ क्र | प्रवेशाचा वर्ग | किमान वय | मानवी दिनांक |
1 | प्ले ग्रुप व नर्सरी | 3 वर्षापेक्षा जास्त | 31 डिसेंबर |
2 | इयत्ता पहिली | 6 वर्षापेक्षा जास्त | 31 डिसेंबर |
सन 2025-26 महाराष्ट्र शासन निर्णय परिपत्रक वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
धन्यवाद. सदर लेखामध्ये आपण माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून अधिक माहितीसाठीशासनाचे अधिकृत पोर्टलवर जाऊन पाहावे.(For RTE admission How to apply in 2025, what are the documents, rules and criteria complete information.? आर.टी.ई प्रवेशासाठी 2025 मध्ये अर्ज कसा करायचा,कागदपत्रे कोणती,नियम व निकष संपुण माहिती)
New rules for birth certificate and Aadhaar card.बाळाचा जन्माचा दाखला व आधारकार्डासाठी नवीन नियम.