DBT Linking 0 Balance Account.


आज सर्व शासकीय योजना,शिष्यवृत्ती किंवा शासकीय मग ते केंद्र सरकारकडील असो किंवा वेगवेगळया राज्य सरकारकडील अनुदान,शिष्यवृत्तीचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरीत करण्यासाठी शासनाने डीबीटी (Direct Benefit To Transfer)प्रणाली सुरु केली आहे. सदर प्रणालीमुळे आज शासकीय अनुदाने किंवा शासनाकडील रक्कमा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरीत करता येत आहेत व या सगळयाप्रणालीमध्ये खुप मोठी पारदर्शकता आली आहे . DBT Linking मुळे मोठ मोठे भ्रष्टाचार कमी झाले आहेत. शासनाची व लाभार्थ्यांची होणारी फसवणुक या प्रणालीमुळे थांबलेली आहे. या सर्व गोष्टीमुळे ही डीबीटी (Direct Benefit To Transfer)प्रणाली खुप फायदेशीर ठरत आहे.तर आज डीबीटी तर पाहूच पण DBT Linking 0 Balance Account.
याबददल सविस्तर माहिती पाहूयात व बेस्ट DBT Linking 0 Balance Account. जे खुप फायदेशीर व वापरण्यास सोपी आहेत याबददल मी सांगणार आहे.
(DBT Linking 0 Balance Account.)

DBT (Direct Benefit To Transfer) Linking Account?


डीबीटी लिंकींग अकाऊंट म्हणजे काय ?

आपले वेगवेगळया बँकमध्ये अकाऊंट असतात. मग राष्ट्रकृत बँकेत किंवा खाजगी बँक मध्ये, मग वेगवेगळया योजनामध्ये आपण आपले बँकपासबुक झेरॉक्स देतो आणि जेंव्हा आपणास आपली रक्कम येणास विलंभ होतो किंवा आपणास सांगितले जाते की आपले खाते DBT लिंक करुन घ्या. तेंव्हा आपण हे काय अजून? बँकेत खाते आहे, माइया फोन पे, गुगल पे, इतर ठिकाणी लिंक आहे मला पैसे येतात. माइया खात्यामधून पैसे जातात हे DBT लिंकीग काय आहे? तर DBT लिंक वरील सांगितल्याप्रमाणे लाभ्यार्थ्याच्या खात्यामध्ये सदरची रककम जमा करण्याची प्रणाली आहे. योजनेचा फायदा घेत असताना. सिस्टम मध्ये जरी आपला अकाउँट नंबर चुकला तरी आपली रक्कम आपल्या DBT लिंकींग खात्यावर जमा होते. डिबीटी लिंकींगमध्ये आपले आधारकार्ड हे बँक खात्याला लिंक केले जाते. DBT लिंकींगमध्ये तुमच्या आधारकार्डला फक्त एकच खाते लिंक होते. जर तुमचे खाते DBT लिंक नसेल तर बँकमध्ये DBT लिंकींगचा फॉर्म भेटतो सदरचा फॉर्म भरुन बँकेत जमा करावा. बँकेत त्यावर काम झाले तर तुमचे खाते लिंक होते. काही वेळ आपल्या आधारकार्ड प्रमाणे आपले बँकेतील सिस्टमध्ये नाव असावे. या सर्व गोष्टी केल्या की आपले अकाउँट लिंक होते. (DBT Linking 0 Balance Account.)

कसे चेक करायचे की आपले खाते DBT Linking आहे की नाही?

आपले खाते डिबीटी लिंक आहे का नाही ते पाहण्यासाठी प्रथम आपल्या आधारकार्डला आपला
मोबाईल लिंक असणे गरजेचे आहे? नसल्यास आपला मोबाईल आधार सेंटरवर जाऊन लिंक करुन
घ्यावा. डिबीटी लिंक आहे का पाहण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.(DBT Linking 0 Balance Account.)

इथे क्लिक करा.

  1. माय आधार च्या ऑफीशयल पेज वर जा.
    2. आपले 12 अंकी आधार दया आणि कॅपच्या देऊन सबमीट करा.
    3. आपल्यास रजिस्टर मोबाईलवर सहा अंकी ओटीपी प्राप्त होईल.सदरचा ओटीपी माय आधारवरील
    पेज वर मागितल्या ठिकाणी भरा आणि सबमीट करा.
    4. माय आधार पेजवर पेज लॉगिन होईल थोडे स्क्रोल करा आपणास बँक सिडींग स्टेटस असा एक पर्याय
    दिसेत त्यावर क्लिक करा आपणास आपले स्टेटस समजेल.
    5. वरील ठिकाणी आपले स्टेटस ज्या बँकेचे नाव दाखवेल त्या बँकेत आपले सर्व सबसिडीचे पैसे जमा होतील
    किंवा जमा झाले असतील.
    6. आपले लिंकींग स्टेटस ठिकाणी कोणतीच बँक लिंक नसेल तर आपल्या खाते असलेल्या बँकेत जावा
    जास्त खाती असतील तर एक बँक निवड व तेथे जाऊन सिडींग म्हणजेच लिंकींगचा फॉर्म भरुन दया.

आपण जर नवीन डिबीटी लिंकींग खाते ओपन करु ईच्छित असाल तर आज आपणास झिरो बँलन्स खाते जी आपण घरी बसून पण किंवा आपल्या जवळच्या किराणा दुकानात,मोबाईल शॉप, कॉमन सर्व्हिसे सेंटर वर जाऊन ओपन करु शकता.

Airtel Payment Bankएअरटेल पेंमेण्टस बँक- सदर ही एक टेलिफोन कंपनी आहे आणि भारतीय रिझर्व्ह बँकने या बँकेने या बँकेस मान्यता दिली आहे. या बँकेची भारतात कोठेही शाखा नाही सदर बँकेचे सर्व व्यवहार हे ऑनलाईन चालतात. खाते ओपनिंग,पासबुक देणे सर्व प्रक्रिया ही त्यांनी नेमलेले CSP(Custmer Service Point)विक्रते किंवा पॉईट धारक बघतात. सदरची प्रक्रिया हा ऑनलाईन व सिक्युअर आहे. आधारकार्ड,पॅनकार्ड,मोबाईल नंबर व काही बेसिक डिटेल्स दिल्यानंतर आपली दिलेली माहिती खात्रीशीर ठरल्यानंतर आपणास सदरचे अकाऊंट दिले जाते.(DBT Linking 0 Balance Account.)

काही नियम व वैशिष्टे

  • लाईफटाईम झिरो बॅलन्स अकाउँट
  • वय वर्ष 18 पुढील लाभार्थ्यासाठी खाते उपलब्ध
  • स्मार्ट फोन वापरुन खाते हाताळू शकता.
  • फोन पे,गुगल पे इतर माध्यमांना जोडू शकता.
  • जवळया कोणत्याही मोबाईल शॉप,किराणा दुकान,ग्राहक सेवा केंद्रामधून अंगठयाचा वापर करुन
  • पैसे काढू किंवा भरु शकता.
  • मोबाईल नंबर हा तुमचा अकाउँट नंबर असेल.
  • आर्थिक देवाण घेवाणीचे मेसेज आपल्या नोंदणीकृत मोबाईल दवारे आपणास मिळतील.
  • डेबीट कार्ड हवे असल्यास उपलब्ध.जवळच्या कोणत्याही एटीएम मधून पैसे काढू शकता.
  • आर्थिक देवणा घेवाण किंवा अकाउँट वापरताना संशयास्पद गोष्टी आढळून आल्यास आपले खाते काही अवधीसाठी बंद केले जाऊ शकते.(DBT Linking 0 Balance Account.)

Ladki Bahin Yojana in 2025-लाडक्या बहिण योजनेचा जानेवारील हफता कधी?

Leave a Comment