केंद्रसरकाराने सरकारी कर्मचा-यांसाठी आता 8 वेतन आयोग लागू करण्यासाठी मंजुरी दिली आहे,विदयमान 7 वा वेतन आयोगाचा कालावधी डिसेंबर 2025 रोजी संपुष्टात येत आहे.या कालावधीपुर्वी आयोगाने 8 व्या आयोग स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
8 वा वेतन आयोग बाबत माहिती- 7 वा वेतन आयोग हा सरत्या वर्षाच्या शेवटी संपत असल्याने 8 वा वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 व्या वेतन आयोगाबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याबाबची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. 8 व्या वेतन आयोगाबाबत आयोगाचे अध्यक्ष व दोन सदस्य अशी एक लवकरच नियुक्ती केली असे वैष्णव यांनी सांगितले आहे.(केंद्रशासनाची सरकारी कर्मचा-यांसाठी 8 व्या वेतन आयोगास मंजुरी. 8th Pay Commission for Government Employees of Central Govt.)
7 वा वेतन आयोग 2016 रोजी स्थापन करण्यात आला होता तो 31 डिसेंबर 2025 रोजी संपुष्ठात येत आहे. केंद्रसरकार आपल्या कर्मचा-यांच्या पगारामध्ये सुधारणा करण्यासाठी व पेन्शन देयके करण्यासाठी अंदाजे दर 10 वर्षांनी एक वेतन आयोग लागू केला जातो व कर्मचा-यांच्या पगार व पेन्शन देयकात सुधारणा होते. 1947 पासून आज पर्यंत सात वेतन आयोग स्थापन करण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या x वर शेअर करत म्हणले आहे की
“विकसित भारत तयार करणासाठीकाम करण-या सर्व सरकारी कर्मचा-यांच्या प्रयत्नांचा आम्हा सर्वाना अभिमान आहे, 8 व्या वेतन आयोगाच्या निर्णयामुळे जीवनमान सुधारेल आणि उपभोगात वाढ होईल”
केंद्र सरकार सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्ता(DA-Dearness Allowance) त्यांच्या मुळ वेतनाच्या
50 टक्के ओलंडल्यानंतर काही महिन्यानंतर सदरच्या 8 वा वेतन आयोगाची घोषणा केली आहे. दिनांक 1 जुलै 2024 पासून
केंद्रसरकारचे निवृत्तीधारक व सरकारी कर्मचारी या दोघांच्या मुळ वेतनाच्या 53 टक्के DA/रिलीफ म्हणून मिळू लागले आणि
उर्वरितची पुनरावृत्ती जानेवारी 2025 साठी सेट केली गेली आहे.केंद्रशासनाची सरकारी कर्मचा-यांसाठी 8 व्या वेतन आयोगास मंजुरी. 8th Pay Commission for Government Employees of Central Govt.)
आता आपण फिटमेंट फॅक्टर समजावून घेऊयात-7 व्या वेतन आयोगाअंतर्गत फिटमेंट फॅक्टर हा 2.57 होता,ज्यामुळे केंद्र सरकारच्या किमान मूळ वेतन 6 व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत वेतन हे 7000 हजारावरुन ते 18000 हजारापर्यंत वाढले,मुळ पगारामध्ये,भत्ते,कामगिरी वेतन वगळले जाते, जेव्हा महागाई भत्ता(DA),घरभाडे(HRA,वाहतूक भत्ता(TA) आणि इतर लाभांशाचा समावेश केला जातो,तेव्हा 7 व्या वेतन आयोगानुसार कर्मचा-याचे वेतन हे 36.020 रुपये प्रति महिने झाले, 8 व्या वेतन आयोगामध्ये सुध्दा बरेचसे बददल घडून शकतात ज्यामध्ये फिटमेंट फॅक्टर वाढून तो 2.86 किंवा 3 टक्क्यापर्यंत जाऊ शकतो आणि मुळ वेतनासह अजुन बददल घडू शकतो.