नमस्कार मित्रांनो,आज आधारकार्ड हे अत्यंत महत्वाचे कागदपत्रात गणले जाते, परंतु आज ग्रामपंचायत,नरपंचायत,महानगरपालिका,ई कडून बालकांच्या जन्माच्या नोंदी घेतल्या जातात,
परंतु कधी या यंत्रानाकडून कर्मचारी आभावी,ई कारणास्तव यामध्ये मोठा चुका होतात व त्याचे परिणाम सामान्य जनतेस भोगावे लागतात. जसे की चुकीचे नाव,कधी बाळाचे नाव चुकते तर कधी आई बाबाचे नाव तर कधी आडनाव,कधी जन्म तारीख चुकते आणि मग नंतर मोठया परिणामांना सामोरे जावे लागते.तर या चुका टाळण्यासाठी आपण जागरुक असणे गरजेचे आहे. तर आपण काय या चुका व्होवु नयेत म्हणून काय करु शकतो?तर बाळाचा जन्म गावात झाला असेल तर आपण संबधीत आरोग विभागाच्या आशाताई किंवा अंगणवाडीच्या ताईशी संपर्क करावा, नंतर आपले संबधीत ग्रामपंचायतमध्ये जाऊनबाळाच्या जन्माची नोंद ही आपण ही स्वताहून दयावी, नोंद देतानाा बाळाचे संपूर्ण नाव,आईचे नाव,बाळाच्या वडीलांच नावे व इतर संबधीत माहिती कार्यालयाीन कर्मचारास दयावी व घेतलेली नोंद ही आपण स्वतहा एका चेक करावी.
हे झाले ग्रामपंचायत बाबत परंतु नगरपालिका व महानगरपालिका या ठिकाणी मोठयाप्रमाणात गर्दी व लोकसंख्याा असल्याने अधिकचे परीश्रम घ्यावे लागता,सामान्यपणे शहरात हॉस्प्टिमध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर संबधीत हॉस्पिटल स्वतहून नोंद देतेच तर कधी राहून जाते, तर हॉसिप्टलने नोंद दिली नसल्यास पाल्यांनी हॉस्पिटल कडून बाळाच्या जन्माचा अहवाल घेऊन संबधीत नगरपालिका,महानगरपालिकेत जावे, सदरचा अहवाल, व संबधीत शासकीय नगरपालिकेचा,महानगरपालिकेचा अर्ज आपण घ्यावा त्यावर सर्व माहिती व्यवस्थित लिहावी,मराठीतील नाव व इंग्रजी भाषेतील नाव हे सर्व लिहून दिल्यानंतर आपणास बाळाचा जन्माचा दाखला प्राप्त होईल परंतु लहान बालकांचे आज आधारकार्ड काढण्यासाठी नवीन नियम घालून दिले आहेत.तर कोणते नवीन नियम आहेत ते पाहू? लहान बालकाचे आधारकार्ड काढण्यासाठी त्या बालकाचा जन्माचा दाखला असणे आवश्यक आहे व सदरचा दाखला हा खालील प्रमाणे असणे आवश्यक आहे.
1.सदरच्या दाखल्यावरती त्या बालकाचे संपूर्ण नाव असणे आवश्यक आहे.(‘शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे काही नरपंचायत,ग्रामपंचायत बालकाचे नाव नंतर आईचे नाव,आईच्या नावानंतर वडीलांचे नाव व नंतर आडनाव देतात)
2.सदरच्या दाखल्यावरती बालकाच्या आईचे (सासरकीडील)संपूर्ण नाव असावे,
3. सदरच्या दाखल्यावरती बालकाच्या वडीलांचे संपूर्ण नाव असावे.
4.सदरच्या जन्माच्या दाखल्यावरती आई व वडील यांचा पत्ता हा व्यवस्थित व पूर्ण असावा.
5. सदरच्या जन्माच्या दाखल्यावरती बारकोड असावा जेणेकरुन पालकास आधाकार्ड काढण्यास अडचण येणार नाही,
6. सदराचा जन्माचा दाखला डिजीटल सही असेल तरी तो कलर प्रिंटमध्ये असावा व त्यावर बारकोड असावा.
7.दाखल्यावरती शाहीचा शिक्का असेल तर तो स्पष्ट असावा व सही व्यवस्थितरीत्या केलेली असावी,
सदय स्थितीत आधाकार्ड काढण्यासाठी पालकांना मोठया प्रमाणात अडचणींना सामोर जावे लागत आहे,जर जन्माच्या दाखल्यावरती बाळाचे फक्त नाव असेल तर आधारकार्डवरती बाळाचे नाव येउु शकतो. तर मोठयाप्रमाणात बोगस दाखले तर करुन आधार कार्ड काढले जाऊ लागले आहे,जर आपल्या बाळाच्या जन्माच्या दाखल्यावरती वरीलप्रमाणे अचुक नोंदी असतील तर आपणास आधारकार्ड किंवा भविष्यात
अडणी प्राप्त होणार नाहीत,आपला जन्माचा दाखला हा आपला वयाचा पुरावा म्हणून सुध्दा आपण वापरु शकतो व सुप्रीम कोर्टाने सुध्दा तसे नोंदवले आहे.
धन्यवाद मंडळी! माइया माहितीप्रमाणे मी आपणास अचूक माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे काही अडणी,सुचना असतील तर आवश्य काळवा.