Magel Tyala Saur Krushi Pump Yojana.मागेल त्याला सौर कृषी पंप योजना.

केंद्रशासनाच्या पाठोपाठ राज्य शासनाने महाराष्ट्रातील शेतक-यांना आता धीर दिला आहे. केंद्रशासनाची कुसुम पाठोपाठ
राज्याने “मागेल त्याला सौर कृषी पंप” ही योजना सुरु केली आहे.महाराष्ट्र शासनाने आता शेतक-यांना मागेल त्याला सोलर
कृषी पंप देणे सुरु केले आहे. शासनाच्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनाच्या पोर्टलवरुन अर्ज करणे सध्या सुरु झाले आहे.
शेतीपंपासाठी आता विदयुत कनेक्शन देणे बंद केले आहे आता विदयुत कनेक्शनसाठी अर्ज करता येत नसून सोलर पंप
साठी अर्ज करावा लागत आहे. (Magel Tyala Saur Krushi Pump Yojana.मागेल त्याला सौर कृषी पंप योजना.)
जागतिक हवामान बददल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील शेतकरीच्या कृषी व्यवसायावर
दुष्परिणम झााले असून शेतकरीवरती मोठयाप्रमाणात नैसर्गिक आपत्ती ओढवल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी अडचणीत आला आहे व यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी बांधवासाठी 3.5 एच पी ते 7.5 एच पी पर्यंतचे शेतक-यांना सबसिडीवरती कृषी पंप देणे सुरु केले आहे. तसेच 7.5 एच पी पर्यंतची विज पण मोफत केली आहे. तरी आपण “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना”याबददल माहिती घेऊयात.

“मागेल त्याला सौर कृषी पंप”योजनेची वैशिष्ट व ठळक बाबी कोणत्या त्या पाहू.


शेतक-यांना सिंचनाचा अधिकार मिळावा यासाठी असणारी स्वयंपूर्ण योजना म्हणजेच-मागेल त्याला सौर कृषी पंप योजना.
फक्त 10 टक्के खर्च स्वता शेतकरी देऊन उर्वरित रक्कम शासन सबसिडी पोटी भरणार.
अनुसुचित जाती (SC)व अनुसुचित जमाती(ST) प्रवर्गातील शेतकरी बांधवांना एकुण सौर कृषी पंपाच्या 5 टक्के इतके पैसे भरावे लागणार.
जमिनीच्या क्षेत्रफळानुसार 3 एची ते 7.5 एचपी पर्यंत पंपाचे वितरण.
विम्यासह पाच वर्षांच्या दुरुस्तीची हमी.

“मागेल त्याला सौर कृषी पंप”आवश्यक कागदपत्रे (Magel Tyala Saur Krushi Pump Yojana.मागेल त्याला सौर कृषी पंप योजना.)


-शेतक-याकडे संबधीत शेतीचा 7/12 उतारा ज्यामध्ये जलस्त्रोताची नोंदणी असावी.उदा- विहीर,कुपनलिका,बोअरवेल, ई.
-सामाईक हिस्सेदाराची जमिन असल्यास हिस्सेदारांचे रुपये 200 च्या स्टँम्पपेपरवती संमतीपत्र.
-आधारकार्ड
-बँक पासबुक
-जातीचे प्रमाणपत्र (अनुसुचित जाती-SC व अनुसुचित जमाती-ST)
-पाणी पुरवठयाचे साधान हे डार्क झोनमध्ये असल्यास भुजल सर्व्हेक्षण यांच्याकडील ना हरकत प्रमाणपत्र.
टिप- उपरोक्त कागदपत्रे ही पीडीएफ मध्ये 500 केबी पेक्षा कमी असावीत.

लाभार्थी निवडीसाठी अटी- (Magel Tyala Saur Krushi Pump Yojana.मागेल त्याला सौर कृषी पंप योजना.)
-2.5(अडीच ऐकर)पर्यंत जमीन असणा-या शेतक-यांना 3 एच पी चे सौलर पंप देण्यात येणार
-2.51 (अडीच ऐकर) पेक्षा जास्त ते 5 एकर पर्यंत असणा-या शेतकरी बांधवांना 5 एच पी चे सौलर पंप मिळतील.
-5 एकर पेक्षा जास्त क्षेत्र असणा-या शेतक-यांना 7.5 एपी क्षमतेचा पंप मिळतील.
-शेतकरी आपल्या पात्रतेपेक्षा कमी क्षमतेचे पंप निवडू शकतात उदा- 7.5 एकर पर्यंतचा शेतकरी 5 एच पी किंवा 3
एच पी चा पंप निवडू शकतात. परंतु 2.5 एकरच्या आतील शेतकरी फक्त 3 एच पी पर्यंतचे पंप निवडू शकतात.
-ज्या शेतक-यांनी आजपर्यंत सौर पंप योजनांचा लाभ घेतला नाही. उदा- अटल सौर पंप योजना किंवा मुंख्यमंत्री सौर
पंप योजना. असे शेतकरी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा फायदा घेऊ शकतात.
-संवर्धनासाठी असलेल्या जलाशयांमुधन पाणी घेण्यासाठी सदरचा पंप वापरता येणार नाही.

अर्ज कसा करायचा ?
खालील लिंक वर क्लिक करा, क्लिक केल्यानंतर शासनाचे ऑफीशयल पेज ओपन होईल.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

क्लिक केल्यानंतर अशाप्रकारे पेज ओपन होईल.

खालील फॉर्म मध्ये मराठी किंवा इंग्रजीमध्ये आपली माहिती भरा. जसे कि वैक्तिक माहिती ज्यामध्ये आपला आधार नंबर,जिल्हा,तालुका,गाव, शेतीचा गट नंबर त्याचा पोट हिस्सा,तसेच लाभार्थ्याचे संपुर्ण नाव व मोबाईल नंबर लाभार्थ्याचे रहिवासी माहिती,लोकेशन तसेच पाणी पुरवठाच्या साधनांची माहिती वगैरे तसेच लाभार्थी बँक तपशील ही सर्व माहिती. व सबमिट करावे, अर्ज सबमिट केल्यांनतर एक विशिष्ठ क्रमांक भेटेल ज्याचा नंतर तपशील पाहण्यासाठी पुढील कामासाठी उपयोग होईल.
धन्यवाद.

Ladki Bahin Yojana in 2025-लाडक्या बहिण योजनेचा जानेवारील हफता कधी?

Leave a Comment