Farmer ID Card- फार्मर आयडी कार्ड म्हणजे काय? शेतक-यांनी हे आधारकार्ड म्हणून कस वापरायचे?त्याचे फायदे काय?संपुर्ण सविस्तर माहिती.


नमस्कार, सध्या शेतक-यांना शासकीय कोणत्याही योजनेचा फायदा घेयचा म्हणले की आपली सर्व कागदपत्रे घेऊन
ज्यामध्ये आपले आधारकार्ड,बँक पासबुक,आपल्या शेतीचा सात बारा उतारा ई कागदपत्रे लागतात. योजना आली त्या
सर्व कागदपत्रांची झेरॉक्स काढून त्या योजनेसाठी संबधीत ऑफीसमध्ये किंवा संबधीत ठिकाणी जमा करावी लागतात.
साध पिक विमाचेच बघा, पिक विमा भरावयचा म्हटल तर शेतक-यांना आधारकार्ड,बँक पासबुक आणि आपल्या
शेतीचा सातबारा काढावा लागयचा आणि तो बँकेत किंवा सीएसी केंद्रामध्ये घेऊन जावे लागयचे. परंतु केंद्रातील मोदी
सरकारने कदाचित शेतक-यांसाठी नवीन प्रयत्न केला आहे अस म्हणव लागेल. सर्वप्रथम वेगवगेळया योजना,प्रत्येक वेळी तीच कागदपत्रे हे सर्व पाहून थोडेफार शिकलेले किंवा युवा शेतकरी कधी म्हणत असतील की सरकारने एकच कार्ड बनवावे जे सर्व योजनांसाठी उपयोगी पडेल आणि प्रत्येक वेळी कागदपत्रे दयावी लागणार नाहीत अस काही आता होणार आहे.तर पाहूयात फॉर्मर
आयडी म्हणजे काय?त्याचे फायदे?आणि ते कसे प्राप्त करायचे?
(Farmer ID Card- फार्मर आयडी कार्ड म्हणजे काय? शेतक-यांनी हे आधारकार्ड म्हणून कस वापरायचे?त्याचे फायदे काय?संपुर्ण सविस्तर माहिती.)

कृषी सचिव देवेश चतुर्वेदी यांनी याबाबत नुकतीच माहिती दिली.ते याबाबत सांगतात की मोदी सरकार कृषी क्षेत्राचे
डिजीटलयझेशन करण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलत आहे आणि फार्मर आयडी हया त्याचाच एक भाग आहे.
लवकरच देशभरातील शेतक-यांची नोंदणी डिजीटल पध्दतीने होणार आहे. व डिजीटलायझेशन झाल्या नंतर शेतक-यांना
एक युनिक ओळखपत्र देण्यात येणार आहे. ॲग्री टेक समिट मध्ये बोलताना चतुर्वेदी म्हणाले की नोंदणी प्रक्रियेसाठी
लवकरच मागदर्शक तत्व सुरु करुन ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडयात फॉर्मर आयडीसाठी काम सुरु होईल. पुढच्या
वर्षी मार्चपर्यंत 5 कोटी शेतकरी बांधवांची नोंदणी करण्याचे मोदी सरकारचे लक्ष आहे. हया उपक्रमसाठी 2817 कोटी
रुपये खर्च करणे यासाठी मंत्रिमंडळाने यास मान्यता दिली आहे.
(Farmer ID Card- फार्मर आयडी कार्ड म्हणजे काय? शेतक-यांनी हे आधारकार्ड म्हणून कस वापरायचे?त्याचे फायदे काय?संपुर्ण सविस्तर माहिती.)

फार्मर आयडी नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. फार्मर आयडी नोंदणी करण्यासाठी
शेतकरी बांधवांना आपल्या जवळील सीएसी(CSC) केंद्रावरती जावे लागेल.

नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा.

फार्मर आयडी नोंदणीसाठी आवश्यक बाबी

1.आधारकार्ड- सदरचे आधारकार्ड हे आपल्या मोबाईलला लिंक असावे. आधारकार्ड लिंक नसल्यास आपणास
बायोमॅट्रीक पध्दतीने ही नोंदणी करता येऊ शकते.
2.आपला डिजीटल सातबारा
3.बॅंक पासबुक
4.रेशनकार्ड
5.आधारकार्ड नोंदणीकृत मोबाइल

  • फार्मर आयडी मुळे शेतक-यांना होणार फायदे
  • शेतक-यांची डिजीटल ओळख निर्माण होईल.
    शेतीविषयक योजनांचे अर्ज भरताना सोयीस्कर होईल.
    भविष्यातील शासकीय योजना घेण्यासाठी फार्मरी आयडी आवश्यक.
    खालील योजनांसाठी फार्मर आयडीचा उपयोग
  • केंद्रशासन योजना (Central Gov Schme)
    PM KISAN
    PMFBY
    AIF
    KCC
    Fertilizer Subsidy
    PMKSY

  • राज्य शासन योजना(State Gov Scheme)
    Farm Loan Scheme
    Mukhyamantri Kisan Sahay Yojana
    Krishi Mahotsav Yojana
    RYTHU Bandu
    Soil Health Card
    Farm Mechanizam Scheme

वरील केंद्रशासनाच्या महत्त्वपुर्ण योजना व राज्य शासनाच्या योजना यासाठी शेतक-याचे फार्मरी आयडी असण आवश्यक आहे. तरी शेतकरी बांधवांनी वरील सर्व कागदपत्रे घेऊन आपल्या जवळील सामाईक सेवा केंद्र तथा सीएसी केंद्रामध्ये जाऊन आपला फार्मर आयडी काढून घ्यावा. फार्मर आयडी फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपणास केंद्रचालक फॉर्म देऊन व आपल्या नोंदणीकृत मोबाईल एक मेसेज येईल ज्यामध्ये फॉर्मरी आयडीचा समावेश असेल.(Farmer ID Card- फार्मर आयडी कार्ड म्हणजे काय? शेतक-यांनी हे आधारकार्ड म्हणून कस वापरायचे?त्याचे फायदे काय?संपुर्ण सविस्तर माहिती.)
धन्यवाद

DBT Linking 0 Balance Account.

Leave a Comment