केंद्रशासनाची सरकारी कर्मचा-यांसाठी 8 व्या वेतन आयोगास मंजुरी. 8th Pay Commission for Government Employees of Central Govt.

केंद्रसरकाराने सरकारी कर्मचा-यांसाठी आता 8 वेतन आयोग लागू करण्यासाठी मंजुरी दिली आहे,विदयमान 7 वा वेतन आयोगाचा कालावधी डिसेंबर 2025 रोजी संपुष्टात येत आहे.या कालावधीपुर्वी आयोगाने 8 व्या आयोग स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

8 वा वेतन आयोग बाबत माहिती- 7 वा वेतन आयोग हा सरत्या वर्षाच्या शेवटी संपत असल्याने 8 वा वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यतेखाली  झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 व्या वेतन आयोगाबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याबाबची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. 8 व्या वेतन आयोगाबाबत आयोगाचे अध्यक्ष व दोन सदस्य अशी एक लवकरच नियुक्ती केली असे वैष्णव यांनी सांगितले आहे.(केंद्रशासनाची सरकारी कर्मचा-यांसाठी 8 व्या वेतन आयोगास मंजुरी. 8th Pay Commission for Government Employees of Central Govt.)

7 वा वेतन आयोग 2016 रोजी स्थापन करण्यात आला होता तो 31 डिसेंबर 2025 रोजी संपुष्ठात येत आहे. केंद्रसरकार आपल्या कर्मचा-यांच्या पगारामध्ये सुधारणा करण्यासाठी व पेन्शन देयके करण्यासाठी अंदाजे दर 10 वर्षांनी एक वेतन आयोग लागू केला जातो व कर्मचा-यांच्या पगार व पेन्शन देयकात सुधारणा होते. 1947 पासून आज पर्यंत सात वेतन आयोग स्थापन करण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या x वर शेअर करत म्हणले आहे की

“विकसित भारत तयार करणासाठीकाम करण-या सर्व सरकारी कर्मचा-यांच्या प्रयत्नांचा आम्हा सर्वाना अभिमान आहे, 8 व्या वेतन आयोगाच्या निर्णयामुळे जीवनमान सुधारेल आणि उपभोगात वाढ होईल”

केंद्र सरकार सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्ता(DA-Dearness Allowance) त्यांच्या मुळ वेतनाच्या
50 टक्के ओलंडल्यानंतर काही महिन्यानंतर सदरच्या 8 वा वेतन आयोगाची घोषणा केली आहे. दिनांक 1 जुलै 2024 पासून
केंद्रसरकारचे निवृत्तीधारक व सरकारी कर्मचारी या दोघांच्या मुळ वेतनाच्या 53 टक्के DA/रिलीफ म्हणून मिळू लागले आणि
उर्वरितची पुनरावृत्ती जानेवारी 2025 साठी सेट केली गेली आहे.केंद्रशासनाची सरकारी कर्मचा-यांसाठी 8 व्या वेतन आयोगास मंजुरी. 8th Pay Commission for Government Employees of Central Govt.)


आता आपण फिटमेंट फॅक्टर समजावून घेऊयात-7 व्या वेतन आयोगाअंतर्गत फिटमेंट फॅक्टर हा 2.57 होता,ज्यामुळे केंद्र सरकारच्या किमान मूळ वेतन 6 व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत वेतन हे 7000 हजारावरुन ते 18000 हजारापर्यंत वाढले,मुळ पगारामध्ये,भत्ते,कामगिरी वेतन वगळले जाते, जेव्हा महागाई भत्ता(DA),घरभाडे(HRA,वाहतूक भत्ता(TA) आणि इतर लाभांशाचा समावेश केला जातो,तेव्हा 7 व्या वेतन आयोगानुसार कर्मचा-याचे वेतन हे 36.020 रुपये प्रति महिने झाले, 8 व्या वेतन आयोगामध्ये सुध्दा बरेचसे बददल घडून शकतात ज्यामध्ये फिटमेंट फॅक्टर वाढून तो 2.86 किंवा 3 टक्क्यापर्यंत जाऊ शकतो आणि मुळ वेतनासह अजुन बददल घडू शकतो.

For RTE admission How to apply in 2025, what are the documents, rules and criteria complete information.? आर.टी.ई प्रवेशासाठी 2025 मध्ये अर्ज कसा करायचा,कागदपत्रे कोणती,नियम व निकष संपुण माहिती

Leave a Comment